---Advertisement---

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन!!

---Advertisement---

बुलढाणा (जि.मा.का.)(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि 14 मे-बुलढाणा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जयस्तंभ चौक परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

जयस्तंभ चौक येथील स्मारक परिसरात सकाळी पारंपरिक पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पंचामृताने अभिषेक करण्यात आला. तसेच एका बालकाला संभाजी महाराजांच्या रूपात पाळण्यात ठेवून सुवासिनींनी पाळणागीत गायले आणि त्याचे ‘संभाजी राजे’ असे नामकरण करण्यात आले.

यानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी स्मारकातील पुतळ्यास पुष्पमाल्य अर्पण करून अभिवादन केले.या कार्यक्रमाला संजय गायकवाड, नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड, नगर परिषदेचे गटनेते मृत्युजय गायकवाड, ओमसिंग राजपूत, सोनू जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment