---Advertisement---

शेगावातील 25 वर्षीय युवक बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील सरकारी फैल परिसरात राहणारे रोहित विलास सौंडकर (वय 25) हे दि. 26 जून 2026 रोजी सकाळी घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्यापासून बेपत्ता आहेत. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायम मिसिंग क्रमांक 47/2026 अन्वये नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

फिर्यादी विलास विश्वनाथ सौंडकर (वय 60, व्यवसाय – शेती, रा. सरकारी फैल, शेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा रोहित हा 26 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला. त्यानंतर त्याचा कोणताही संपर्क झालेला नसल्याने 29 जून रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

रोहित विलास सौंडकर याचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : उंची अंदाजे 170 सें.मी., रंग गोरा, शरीरयष्टी मध्यम, सरळ काळे केस, पूर्ण दाढी व मिशी. डाव्या हाताच्या मनगटावर इंग्रजीत “Bhaiya” असे गोंदलेले आहे. अंगात आकाशी निळसर रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केली होती.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ रामदास घट्टे करीत आहेत. संबंधित युवकाबाबत कोणाला कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ शेगाव शहर पोलीस ठाण्याशी किंवा तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment