---Advertisement---

संग्रामपूर तालुक्यात वादळी वाऱ्याने केळी बागांचे मोठे नुकसान; विमाधारक शेतकऱ्यांना तातडीने तक्रार दाखल करण्याचे आवाहन!!

---Advertisement---

संग्रामपूर,(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. २ जून – संग्रामपूर तालुक्यात १ जून रोजी सायंकाळी आलेल्या वादळी व चक्री वाऱ्यामुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ४० किलोमीटरपेक्षा अधिक असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.

केळी पिक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळविण्यासाठी तातडीने १४४४७ या टोल फ्री क्रमांकावर अथवा Crop Insurance ॲपवर तक्रार दाखल करावी, असे आवाहन भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय हागे यांनी केले आहे.

तक्रार दाखल करताना “Strong Wind (वेगाचा वारा)” हा पर्याय निवडावा तसेच नुकसानीची तारीख १ जून २०२६ नमूद करावी. यापूर्वी तक्रार दाखल केलेल्या शेतकऱ्यांनीही पुन्हा तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी सांगितले.

वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी आपला विमा दावा लवकरात लवकर नोंदवावा. तसेच नुकसान झालेल्या शेतातील जिओ-टॅग असलेले छायाचित्रे काढून जतन करून ठेवावीत, जेणेकरून विमा दाव्याच्या प्रक्रियेत त्यांचा उपयोग होईल.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता विमा दावा दाखल करून शासनाच्या मदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment