---Advertisement---

Sesfund Yojana 2026: सेसफंड योजनेअंतर्गत कृषी यंत्रसामग्रीसाठी ७५ टक्के अनुदान; शेतकऱ्यांनी २० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा!!

---Advertisement---

बुलढाणा : (युवा क्रांती वृत्तसेवा) : जिल्हा परिषद बुलढाणा कृषी विभागाच्या सेस फंड योजनेअंतर्गत सन २०२६-२७ मध्ये शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्रसामग्रीसाठी ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना ५ एच.पी. मोटारपंप संच, ट्रॅक्टरचलित रोटाव्हेटर, बी.बी.एफ. प्लांटर, पेरणी यंत्र आदी कृषी साहित्याचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील पंचायत समितीच्या कृषी विभागातील कृषी अधिकारी (सामान्य) किंवा विस्तार अधिकारी (कृषी) यांच्याशी संपर्क साधून योजनेची माहिती घ्यावी.

योजनेअंतर्गत विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे २० सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करून सेस फंड योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद बुलढाण्याचे कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment