---Advertisement---

भरधाव कारचा अपघात; निष्काळजीपणामुळे ४० हजारांचे नुकसान!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : अकोट–शेगाव मार्गावरील हॉटेल ओमकारजवळ भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या कारमुळे अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एका कारचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवहरी गजानन शेळके (वय २६, रा. कान्हेरी सरप , ता. बार्शी टाकळी, जि. अकोला) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी अल्टो कार (क्र. MH 30 BB 3513) चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५ (अ), ३२४ (४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही घटना २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी चालक हा आपली कार भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवत असताना कारचे पुढील डावे टायर फुटले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि संबंधित कारने फिर्यादीच्या अर्टिगा कारला समोरून धडक दिली.

या अपघातात फिर्यादीच्या कारचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला असून तपास हेड कॉन्स्टेबल रामदास घट्टे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment