---Advertisement---

आनंद विसावा मंडपातून मोबाईल व कागदपत्रांची चोरी; शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव येथील गजानन महाराज संस्थानच्या आनंद विसावा मंडप क्रमांक 1 मधून मोबाईल व महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिपीन शेषेराव राउत (वय 32, रा. गोधनी रेल्वे, नागपूर) हे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे आले होते. ते आनंद विसावा मंडप क्रमांक 1 मध्ये वास्तव्यास होते. दि. 24 मे 2026 रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ते आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करून परत आल्यानंतर त्यांच्या कॉटजवळ ठेवलेली बॅग दिसून आली नाही.

यानंतर त्यांनी मंदिराच्या चौकशी कक्षात जाऊन विचारपूस केली असता त्यांची बॅग मिळाली, मात्र त्यामधील विवो कंपनीचा मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र तसेच 1 हजार 200 रुपयांची रोकड गायब असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणात अज्ञात चोरट्याने एकूण 21 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार फिर्यादीने दिली आहे. त्यावरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायमी अपराध क्रमांक 338/2026 कलम 303(2) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोना रवी इंगळे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment