शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलिसांनी इकबाल चौक परिसरातील आशिर्वाद गेस्ट हाऊसवर छापा टाकत अनैतिक देहव्यापार प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे कलम 3, 4, 5 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक कुणाल दिलीप जाधव आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 22 मे 2026 रोजी सायंकाळी 7 ते 8:10 वाजेदरम्यान इकबाल चौक येथील आशिर्वाद गेस्ट हाऊस येथे छापा टाकण्यात आला. या ठिकाणी महिलांचा अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या प्रकरणात आरोपी म्हणून
- गणेश साहेबराव खरात (रा. खामगाव),
- आदेश श्रावण काळे (रा. अमरावती),
- यश अशोक पैठणकर (रा. खामगाव),
- गजानन आत्माराम निर्मळ (रा. खामगाव),
- हुसेन खान अजगर खान (रा. शेगाव)
आणि आशिर्वाद गेस्ट हाऊसच्या मूळ मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या कारवाईत नगदी असा एकूण 4 हजार 175 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हुसेन खान हा आशिर्वाद गेस्ट हाऊस येथे महिलांना बोलावून ग्राहकांकडून पैसे घेऊन देहविक्रीचा व्यवसाय चालवत होता. तसेच इतर आरोपी हे ग्राहक म्हणून त्या ठिकाणी आढळून आले. गेस्ट हाऊसच्या मालकानेही जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मेहेत्रे हे स्वतः करीत आहेत.







