---Advertisement---

शेगांव शहरात दुचाकीतून हॅन्डबॅग चोरी; लाखोंच्या चेकसह रोख रक्कम लंपास!!

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील अब्दुल हमीद चौक परिसरात दुचाकीच्या डिक्कीमधून हॅन्डबॅग चोरी झाल्याची घटना 14 एप्रिल रोजी सकाळी घडली असून या घटनेत रोख रक्कम व लाखों रुपयांचे चेक लंपास करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्यामसुंदर रघुनाथ पटोकार (वय 47, रा. आदर्श नगर, शेगांव) हे बांधकाम ठेकेदार असून ते 14 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 11.15 वाजताच्या सुमारास मोबाईल दुरुस्तीकरिता अब्दुल हमीद चौक येथील एका दुकानात गेले होते. त्यांनी आपली अॅक्टीव्हा (क्र. MH-28 AW 3025) दुकानाजवळ उभी केली होती.मोबाईल दुरुस्ती करून परत आल्यानंतर त्यांच्या गाडीच्या सीटखालील डिक्कीमधील पांढऱ्या रंगाचा रुमाल बाहेर आलेला दिसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी डिक्की उघडून पाहिली असता त्यामध्ये ठेवलेली काळ्या रंगाची हॅन्डबॅग चोरीस गेल्याचे आढळून आले.

सदर हॅन्डबॅगमध्ये सुमारे 40 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच उसनवारीच्या व्यवहारातील एकूण 8 लाख 50 हजार रुपयांचा ICICI बँकेचा चेक आणि शेगाव अर्बन बँकेचे प्रत्येकी 6 लाख रुपयांचे दोन चेक होते. या सर्वांसह हॅन्डबॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे.घटनेनंतर फिर्यादीने परिसरात शोध घेतला, मात्र चोरी गेलेली बॅग मिळून आली नाही. याप्रकरणी शेगांव शहर पोलीस ठाण्यात अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन वाघमारे करत आहेत. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी वाहने उभी करताना मौल्यवान वस्तू डिक्कीमध्ये ठेवू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment