शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेंद्र शिवनारायण लहाने (वय ६१, व्यवसाय निवृत्त शिक्षक, रा. माळीपुरा, शेगाव) यांनी आपली हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटारसायकल (क्र. MH 28 AH 9044) दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.५५ वाजता नगर परिषद गेटजवळ उभी केली होती.
यानंतर ते आपल्या मित्रासोबत जवळच बसले होते. दुपारी सुमारे १२.३० वाजता मोटारसायकल घेण्यासाठी गेले असता ती जागेवर आढळून आली नाही. परिसरात शोध घेतल्यानंतरही मोटारसायकल मिळून आली नसल्याने अज्ञात इसमाने ती चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
सदर मोटारसायकलची अंदाजे किंमत २० हजार रुपये असून या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा क्रमांक २७३/२६ दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गजानन वाघमारे करीत आहेत.







