---Advertisement---

शेगावात बैलांची निर्दयी वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील शिवाजी चौक परिसरात बैलांची निर्दयी पद्धतीने वाहतूक करत असल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 11 जून 2026 रोजी सायंकाळी 5.54 वाजताच्या सुमारास आरोपी शेख सलीम शेख अजिज (वय 40) व शेख अफसर शेख अक्तर (वय 31, दोघेही रा. बावणबीर ता. संग्रामपूर जि. बुलढाणा) हे टाटा ACE मालवाहू वाहन क्रमांक MH 47 E 0102 मध्ये दोन बैलांची दाटीवाटीने वाहतूक करताना आढळून आले.

प्रत्येकी 40 हजार रुपये किमतीचे असे एकूण 80 हजार रुपयांचे बैल आखूड दोरीने बांधून, चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी नेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या प्रकरणी पोहेकॉं योगेश सोपान चोपडे यांच्या फिर्यादीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 (अ), 5 (ब), 9 तसेच प्राणी निंदयतेने वागविणे अधिनियम कलम 11 (1) (घ), (ड), (च) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद पोहेगाव विनायक सरोदे यांनी केली असून, पुढील तपास पोहेका गणेश वाकेकर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment