---Advertisement---

शेगाव बसस्थानकात वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पोत चोरी; 21 हजारांचा ऐवज लंपास!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा): शहरातील एसटी बसस्थानक परिसरात बसमध्ये चढत असताना एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पोत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी सौ. कलमबाई श्रीकृष्ण भटकर (वय 65, रा. निपाणा ता. खामगाव जि. बुलढाणा) या दि. 23 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास शेगाव येथील एसटी बसस्थानकावर बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील जुने वापरते सोन्याचे पोत चोरून नेले.

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेडॉल किंमत अंदाजे 9 हजार रुपये तसेच 4 ग्रॅम वजनाचे चौकोनी सोन्याचे मणी किंमत अंदाजे 12 हजार रुपये असा एकूण 21 हजार रुपयांचा ऐवज असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात दि. 28 मे रोजी कलम 303(2) भा.न्या.सं. 2023 अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ श्याम आघाव हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment