---Advertisement---

शेगावात भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन; बालकलागुणांना मिळणार व्यासपीठ!!

---Advertisement---

शेगाव, (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 15 जून 2026 – भारतीय जनता पार्टी, शेगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने बालकांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य चित्रकला स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. 18 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजता अग्रसेन भवन, शेगाव येथे पार पडणार आहे.

स्पर्धेत शेगाव परिसरातील जास्तीत जास्त मुला-मुलींनी सहभागी होऊन आपल्या कलेचे सादरीकरण करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. स्पर्धा दोन गटांमध्ये होणार असून गट क्रमांक 1 मध्ये 6 ते 12 वर्षे तर गट क्रमांक 2 मध्ये 13 ते 18 वर्षे वयोगटातील स्पर्धकांचा समावेश राहणार आहे.

दोन्ही गटांसाठी प्रथम पारितोषिक 3,100 रुपये, द्वितीय पारितोषिक 2,100 रुपये आणि तृतीय पारितोषिक 1,100 रुपये ठेवण्यात आले आहे. स्पर्धेसाठी ड्रॉइंग शीट आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार असून रंग, ब्रश व इतर साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहे.

स्पर्धकांनी आपली नोंदणी पुढील ठिकाणी करावी :

  • श्री यादव बेकरी, अग्रसेन चौक, शेगाव
  • शुभ आशीर्वाद मेडिकल स्टोर, शितला माता मंदिर जवळ, शेगाव

या उपक्रमासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभत असून आयोजकांनी पालकांनी आपल्या पाल्यांना मोठ्या संख्येने सहभागी करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.

संपर्कासाठी :
📞 8208242727 / 9604974360 / 9273946797

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment