आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीय सहाय्यक प्रकाश राऊत नागरिकांच्या समस्या जाणून घेणार!!
शेगाव : (युवा क्रांती वृतसेवा) : नागरिकांच्या विविध प्रशासकीय व दैनंदिन समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी भारतीय जनता पार्टी शेगाव शहर व ग्रामीणच्या वतीने विशेष जनसंपर्क उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत विश्राम भवन (रेस्ट हाऊस), शेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
आमदार डॉ. संजय भाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश भाऊ राऊत हे या उपक्रमाला स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेणार आहेत. विविध शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रलंबित कामे, प्रशासकीय अडचणी तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्यासाठी या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे.
या जनसंपर्क उपक्रमात नागरी प्रशासकीय सेवा, तहसील कार्यालयीन कामे, शैक्षणिक समस्या, आरोग्यविषयक तक्रारी, कृषी विभागाशी संबंधित अडचणी तसेच इतर नागरी समस्यांबाबत नागरिकांना आपली गाऱ्हाणी मांडता येणार आहेत.
दरम्यान, आपल्या प्रभागातील तसेच गावातील नागरिकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवावी, असे आवाहन भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे. ज्या नागरिकांची शासकीय अथवा प्रशासकीय कामे प्रलंबित आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली समस्या मांडावी, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
नागरिकांनी या विशेष जनसंपर्क उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी शेगाव शहर व ग्रामीणच्या वतीने करण्यात आले आहे.








