---Advertisement---

Shegaon Crime : शेगावात देशी दारू विक्रीप्रकरणी एकावर कारवाई; 17 बाटल्यांसह ₹680 चा मुद्देमाल जप्त!

---Advertisement---

शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील म्हाडा कॉलनीतून सैनिक कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पोलिसांनी कारवाई करत देशी दारू विक्रीप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत 17 नग देशी दारूच्या बाटल्या व वायरची थैली असा एकूण ₹680 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवि ओंकार जाधव (वय 42, रा. खळवाडी, शेगाव) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 13 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5.35 ते 6 वाजेदरम्यान करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार फिर्यादी पोहेकॉ. गणेश जगदेव वाकेकर यांनी पोलीस पथक व पंचांसह घटनास्थळी प्रोव्ही रेड केली. यावेळी आरोपीच्या ताब्यातून बॉबी संत्रा कंपनीच्या 90 एमएलच्या 17 देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. प्रत्येक बाटलीची किंमत ₹40 असून, दारूची एकूण किंमत ₹680 आहे.

याप्रकरणी पोहेकॉ. रवी इंगले यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोहेकॉ. सुनील सुसर करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment