---Advertisement---

दुहेरी आत्महत्या; शेगांव आणि नागझरी परिसरात एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ!!

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 16 एप्रिल — शहरातील नागझरी रोड परिसरात आज सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोन्ही प्रकरणांची नोंद शेगांव शहर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यू (अ.मृ.) म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पहिल्या घटनेत सिंध्दाथ दिपाजी कळसकार (वय 46, रा. तिनपुतळे परिसर, नागझरी रोड) यांनी बांधकाम सुरू असलेल्या घराच्या खिडकीच्या लोखंडी ग्रीलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना सकाळी अंदाजे 6.30 वाजण्यापूर्वी घडली. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती दारूच्या नशेत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल वानखेडे यांनी नोंद केली असून पुढील तपास पोहेका वाकेकर करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत सुनील अरुण सरदार (वय 30, रा. नागझरी, ता. शेगांव) यांनी आपल्या राहत्या घरातील खोलीत लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घरातील सदस्यांना संशय आल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर सुनील यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणातही दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद पोहेका वानखेडे यांनी केली असून तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक गजानन गावंडे करीत आहेत.

दोन्ही घटनांमुळे दोन्ही ठिकाणी शोककळा पसरली असून पोलीसांकडून आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment