---Advertisement---

पुनर्विवाहितेचा हुंड्यासाठी छळ; पती व सासूविरोधात शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत एका पुनर्विवाहित महिलेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 85, 115(2), 351(2), 3(5) तसेच हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 च्या कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला (वय 34) रा. ज्ञानेश्वरी नगर, अकोट रोड, शेगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा पुनर्विवाह आरोपी राहुल काशिनाथ दाणे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर आरोपी राहुल दाणे व त्यांची आई उषा काशिनाथ दाणे, रा. शक्ती नगर, दुर्गापूर कॉलनी, चंद्रपूर यांनी फिर्यादीस कमी हुंडा मिळाल्याचे सांगत सतत टोमणे मारले.

तसेच “तुझ्या आई-वडिलांनी लग्नात कमी साहित्य व कमी सोनं दिलं”, “दुसरी मुलगी असती तर जास्त हुंडा मिळाला असता” असे बोलून मानसिक छळ केला जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीने समजावण्याचा प्रयत्न केल्यास आरोपी सासू उषा दाणे या आरोपी राहुल दाणे यास भडकवत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यानंतर फिर्यादीस मारहाण करून हात पिरगळणे, केस धरून बेडरूममधून बाहेर ओढणे तसेच हात, पाठ व मांडीवर मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, एक्स-रेसाठी दवाखान्यात गेल्यानंतरही “डॉक्टरांना काही सांगू नको, नाहीतर जीवाने मारून टाकू” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत वेळोवेळी छळ केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

सततच्या त्रासामुळे व जीवाला धोका असल्याने फिर्यादीला अखेर माहेरी जाऊन राहावे लागत असल्याचे समोर आले आहे.

सदर प्रकरणी मा. पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या पत्रानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास PSI गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment