शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील श्री गजानन महाराज मंदिर परिसराच्या मागील भागात राहणारे हरिदास तुळशीदास ठाकूर (वय ५२, दोबाल वेस) यांना आज दि. २७ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास एक मोबाईल फोन बेवारस स्थितीत मिळून आला.
प्रामाणिक नागरिकाचे कर्तव्य पार पाडत त्यांनी अंदाजे १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल शेगाव शहर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर हजर असलेले पोहेकॉ. वासुदेव वानखडे यांच्याकडे जमा केला.
दरम्यान, संबंधित मोबाईल ज्या व्यक्तीचा असेल त्यांनी मोबाईलचे बिल व ओळखपत्रासह शेगाव शहर पोलिस ठाण्यात संपर्क साधून मोबाईल ताब्यात घ्यावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.









