शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव शहरातील माता-भगिनींसाठी एक महत्त्वाची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत नगर परिषद शेगाव (महिला व बालकल्याण विभाग) यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर सोमवार, ४ मे २०२६ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत नगर परिषद टाऊन हॉल, शेगाव येथे पार पडणार आहे.
या शिबिरात महिला व बालकांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून, विविध आरोग्य समस्यांवर मोफत सल्ला व मार्गदर्शन दिले जाणार आहे.
👉 “निरोगी माता, सुदृढ बालक” या उद्दिष्टाने आयोजित या शिबिराचा लाभ शेगाव शहरातील जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
तसेच, ही माहिती आपल्या परिसरातील महिला, बचतगट व गरजूंपर्यंत पोहोचवण्याचेही आवाहन नगर परिषद शेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.








