---Advertisement---

शेगावमध्ये 40 वर्षीय व्यक्तीचा अकस्मात मृत्यू; पोलीस तपास सुरू!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरात एका 40 वर्षीय व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये मर्ग कायमी क्र. 19/2026, कलम 194 BNSS अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.

मृत व्यक्तीचे नाव गजानन वामन गावंडे (वय 40 वर्ष, रा. खेर्डा ता. शेगाव, जि. बुलढाणा) असे आहे. दि. 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:00 वाजण्यापूर्वी ही घटना घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स.मोसा रुग्णालय, शेगाव येथील कक्ष सेवक पंकज पाखरे (वय 30 वर्ष) यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. खेताळे यांच्या सहीचा लेखी मेमो (क्र. 8083) पोलीस स्टेशनला सादर केला. त्यानुसार गजानन गावंडे यांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सदर माहितीच्या आधारे पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेका गजानन वाघमारे यांच्याकडे सोपविण्यात आला असून दाखला अधिकारी म्हणून पोहेका सुनील सुसर यांनी नोंद केली आहे.

पोलीसांकडून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून पुढील तपास चालू आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment