---Advertisement---

शेगावातील भारत गॅस एजन्सीत वाद; तिघांविरोधात जातीय एनसी दाखल!!

---Advertisement---

शेगाव |(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. ६जूनशेगाव शहरातील माउली टॉवर परिसरातील सिद्धी विनायक भारत गॅस एजन्सीमध्ये ग्राहकांकडून जादा पैसे घेणे व उद्धट वागणुकीच्या तक्रारीवरून झालेल्या वादानंतर तिघांविरोधात शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये जातीय एनसी दाखल करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्जदार वामनराव विनायकराव देशमुख (वय 62, व्यवसाय-भारत गॅस एजन्सी, रा. माउली टॉवर, शेगाव) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या सिद्धी विनायक भारत गॅस एजन्सीमध्ये सुमारे 20 कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी काही कर्मचारी घरपोच सिलेंडर वितरणाचे काम करतात.

ग्राहकांकडून कंपनीने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे मागणे तसेच उद्धट व असभ्य वागणूक देत असल्याच्या अनेक तक्रारी संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार दि. 03 जून रोजी सकाळी 10.30 वाजता अर्जदार यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावून जाब विचारला.

यावेळी गैरअर्जदार जावेद खाँ मुजाहीद खाँ (रा. इदगाह प्लॉट, शेगाव), सुरेश किसन मिसाळ (रा. बालाजी फैल, शेगाव) व शेख सोहेल शेख हमीद (रा. लेंडी तलाव, शेगाव) यांनी अर्जदार व त्यांच्या मुलास शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच “तुम्ही सिलेंडर विक्रीचा व्यवसाय कसा करता व इतर कर्मचारी कामावर कसे येतात ते पाहतो,” अशी धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये कायमी जातीय एनसी क्रमांक 288/2026 अन्वये भा.न्या.सं. 2023 कलम 352, 351(2), 3(5) अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोहेका निलेश गाडगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment