---Advertisement---

शेगावमध्ये तरुणीचे अपहरण; पांढऱ्या चारचाकीत जबरदस्तीने बसवून नेल्याचा आरोप!

---Advertisement---

शेगाव : (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने एका २२ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी (वय 32), व्यवसाय टेलरकाम, रा. बाजार फैल, शेगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची भाची (वय 22, रा. शंकरनगर खामगाव, ह.मु. बाजार फैल शेगाव) हिला आरोपी शेख जाफर शेख अनीस (वय अंदाजे 24, रा. बाजार फैल शेगाव) याने दि. 26 मे 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास शनिमंदिरासमोरील शिवनेरी चौक परिसरातून पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात जबरदस्तीने बसवून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी फिर्यादी यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून त्यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ श्याम आघाव करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment