---Advertisement---

शेगांवात ‘गो सम्मान दिवस’ उत्साहात; गो महिमा कथा, गोपालक सत्कार व भव्य दिंडीचे आयोजन!!

---Advertisement---

शेगांव : (युवा क्रांती वृत्तसेवा) : गोसंवर्धन आणि गोमातेच्या सन्मानासाठी शेगांव तालुक्यात सोमवार, दि. २७ एप्रिल २०२६ रोजी ‘गो सम्मान दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने गो महिमा कथा, गोपालक सत्कार समारंभ तसेच भव्य सनातनी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून सकल हिंदू समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, शेगांव शहर व तालुक्यातील समाजबांधव, शेतकरी, व्यापारी, विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, साधू-संत, वारकरी तसेच विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

गोमातेची सेवा, संरक्षण तसेच तिला ‘राष्ट्रमाता’चा दर्जा मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन तहसीलदारांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता श्रीराम कथा मंडप, पालडिवाल लेआऊट, श्रीराम नगर येथे गो महिमा कथेद्वारे होणार आहे. त्यानंतर याच ठिकाणी शेगांव शहर व ग्रामीण भागातील गोपालकांचा सत्कार समारंभ पार पडणार आहे. सकाळी ९ वाजता याच मंडपातून भव्य सनातनी दिंडीला प्रारंभ होऊन तहसील कार्यालयाकडे प्रस्थान करण्यात येणार आहे.

शेगांव शहरातील नागरिकांनी आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून या सामाजिक व धार्मिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकजूट दर्शवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment