---Advertisement---

शेगावमध्ये देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलिसांनी अवैध देशी दारू विक्रीप्रकरणी कारवाई करत एका ज्येष्ठ व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कलम 65 (इ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भगवान त्र्यंबक गायकवाड (वय 65 वर्षे, रा. व्यंकटेशनगर, शेगाव) याच्यावर कारवाई करण्यात आली. दि. 18 मे 2026 रोजी रात्री 8:05 वाजताच्या सुमारास आठवडी बाजारातील जगदीश ट्रेडिंग कंपनी दुकानासमोर ही कारवाई करण्यात आली.

पोहेका गजानन प्रल्हाद वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकला असता आरोपीच्या ताब्यातून “टैंगो पंच” कंपनीच्या 90 एमएल मापाच्या देशी दारूच्या 17 बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत 680 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका श्याम आघाव करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment