शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरात अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत 65 वर्षीय महिलेला अटक केली आहे. ही कारवाई 4 मे 2026 रोजी सायंकाळी आठवडी बाजार परिसरात करण्यात आली.
पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- फिर्यादी: पोका नरेश भास्कर तायडे (ब.न. 2052)
- आरोपी: सौ. विमलबाई समाधान किरोते (वय 65 वर्षे, रा. धनगर फैल, शेगाव)
- घटनास्थळ: गगन इलेक्ट्रिक समोर, आठवडी बाजार, शेगाव
- घटनेची वेळ: 04 मे 2026, सायं. 6.00 ते 6.30 वाजेपर्यंत
पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला असता आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
- देशी दारू (टैंगो पंच 90 ML) – 35 बाटल्या
- एकूण किंमत: ₹1,400
या प्रकरणी दाखल अधिकारी पोहेका सरोदे यांनी गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोहेका आघाव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत अवैध दारू विक्री हा दंडनीय गुन्हा असून, आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.








