---Advertisement---

शेगांवात अवैध देशी दारूवर पोलिसांची धडक कारवाई!!

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगांव शहरात अवैध दारू विक्रीविरोधात शेगांव शहर पोलीस स्टेशन यांनी एका वयस्कर व्यक्तीवर कारवाई केली आहे. या कारवाईत देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.दि. ९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२:५० वाजता, सोहम इलेक्ट्रिक दुकानासमोर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला.या वेळी भगवान त्रंबक गायकवाड (वय ६५, रा. व्यंकटेश नगर, शेगांव) यांच्याकडे अवैध देशी दारू साठवून ठेवलेली आढळली.

कारवाईदरम्यान आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला :

टेंगो पंच कंपनीची ९० एम.एल.ची १७ देशी दारूच्या बाटल्या, प्रत्येकी किंमत ₹४० प्रमाणे एकूण ₹६८०/-, एक वायरची थैली,एकूण जप्त माल: ₹६८०/- या प्रकरणी शेगांव शहर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास सुरू असून, पोलिसांनी अवैध दारूविक्रीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे.

घटनेचा पुढील तपास ठाणेदार निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका श्याम अघाव करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment