---Advertisement---

शेगावमध्ये अवैध दारू विक्रीवर कारवाई; आरोपीकडून देशी दारू जप्त!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कारवाई करत देशी दारूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाला कन्हैयालाल कच्छवा (वय ३६, रा. व्यंकटेशनगर, शेगाव) याच्याकडे विनापरवाना देशी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला. या कारवाईत आरोपीकडून टॅगो पंच कंपनीच्या ९० एमएलच्या १८ देशी दारूच्या बाटल्या (किंमत अंदाजे ७२० रुपये) आणि एक वायरची पिशवी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई २९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.४५ ते ७.१५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल गजानन वाघमारे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील सुसर करीत असून पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment