शेगाव, दि. 20 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव शहर पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधातील मोहिमेत आणखी एक कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत देशी दारूच्या 18 शिश्या जप्त करण्यात आल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जून रोजी रात्री 8.10 ते 8.30 वाजेदरम्यान शेगाव येथील आठवडी बाजार परिसरात छापा टाकण्यात आला. या कारवाईत सुनील सिद्धार्थ शेगोकार (वय 34 वर्षे, रा. खळवाडी, घर क्र. 316, शेगाव) याच्या ताब्यातून अवैधरित्या विक्रीसाठी ठेवलेली देशी दारू आढळून आली.
आरोपीकडून टेंगो पंच कंपनीच्या 90 एम.एल.च्या 18 देशी दारूच्या शिश्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत 720 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. यासह एक वायरची थैलीही जप्त करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शंकर गवई यांच्या फिर्यादीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 391/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम आघाव करीत आहेत. शेगाव शहर पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.










