---Advertisement---

चारमोरी पुलाजवळ देशी दारू जप्त; शेगाव शहर पोलिसांची कारवाई!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलिसांनी इंदिरानगर रोडवरील चारमोरी पुलाजवळ कारवाई करत अवैध देशी दारूसह एका आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी शेगाव शहर पोलिस ठाण्यात अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (इ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करण सुनील शुक्ला (वय 28, रा. इंदिरानगर, शेगाव) याच्यावर खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पंचासमक्ष प्रोव्ही रेड करण्यात आली. या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून टँगो पंच कंपनीच्या 90 एमएल मापाच्या कंपनी सिलबंद देशी दारूच्या 200 प्लास्टिक शिश्या जप्त करण्यात आल्या. प्रत्येकी शिशीची किंमत 40 रुपये असून एकूण मुद्देमालाची किंमत 8 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई दि. 25 मे 2026 रोजी सायंकाळी 7 ते 7.40 वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली. फिर्यादी म्हणून पोहेका गजानन प्रल्हाद वाघमारे यांनी तक्रार दिली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास नापोका रवी इंगळे हे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment