---Advertisement---

शेगावात अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; 50 टँगो दारूच्या बाटल्या जप्त!

---Advertisement---

शेगाव I (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात अवैध देशी दारूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर शेगाव शहर पोलिसांनी छापा टाकून एका व्यक्तीविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 50 सिलबंद देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जुलै 2026 रोजी दुपारी 12.35 ते 1.05 वाजण्याच्या सुमारास जुन्या बसस्थानक परिसरात पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. या कारवाईत संतोष अरुण मानकर (वय 37, रा. अकोट रोड, खळवाडी, शेगाव) याच्या ताब्यातून टँगो पंच कंपनीच्या 90 एमएल क्षमतेच्या 50 सिलबंद देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत 2 हजार रुपये असून, त्यासोबत एक वायरची पिशवीही जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय रामकृष्ण तायडे यांच्या फिर्यादीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शाम आघाव करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment