शेगाव |(युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायमी मिसिंग क्रमांक 40/2026 नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी किरण दत्तात्रय चोपडे (वय ५० वर्षे, व्यवसाय – शेती, रा. पातुर्डा ता. संग्रामपूर जि. बुलढाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी कु. ईश्वरी किरण चोपडे (वय १८ वर्षे) ही दि. ८ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ८:३० वाजता शेगाव येथील गजानन स्कूलमध्ये बारावीची टीसी आणण्यासाठी गेली होती. मात्र बराच वेळ उलटूनही ती घरी परत न आल्याने नातेवाईक व परिसरात शोध घेण्यात आला. तरीही ती मिळून न आल्याने शेवटी पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली.
बेपत्ता तरुणीचे वर्णन
- नाव : कु. ईश्वरी किरण चोपडे
- वय : १८ वर्षे
- रंग : सावळा
- बांधा : मजबूत
- उंची : ५ फूट ३ इंच
- केस : लांब काळे
- अंगात : पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट
- पायात : हिरव्या रंगाची सँडल
- सोबत : निळ्या रंगाची बॅग, ज्यावर इंग्रजीत “WILD-CRAFT” असे लिहिलेले
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका गाडगे करीत आहेत.







