---Advertisement---

वाटिका परिसरात माने चौपाटीला आग – दोन सिलेंडर स्फोटांची प्राथमिक माहिती!!

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): शहरातील वाटिका परिसरात असलेल्या माने चौपाटी येथे आज दि : 22 एप्रिल ला अचानक आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, या आगीत गॅस सिलेंडरचे दोन स्फोट झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, चौपाटीवरील एका स्टॉलमधून आग लागल्याचे प्रथम दिसून आले. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले आणि त्यानंतर सलग दोन सिलेंडर स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला. स्फोटामुळे आजूबाजूच्या दुकानांमध्ये घबराट पसरली आणि लोकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, सध्या आग आटोक्यात आणण्यात यश आल्याची माहिती मिळत आहे.

घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, गॅस गळतीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस आणि संबंधित यंत्रणा पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment