शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा): शहरातील उड्डाणपुलाखाली सुरू असलेल्या वरळी मटका जुगारावर शेगाव शहर पोलिसांनी धाड टाकून एका आरोपीला पकडले आहे.
दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास पोहेका गणेश जगदेव वाकेकर व सहकारी पोलीस कर्मचारी योगेश जाधव हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे त्यांनी पंचांसह घटनास्थळी धाड टाकली.
या कारवाईत शालिग्राम रामचंद्र राऊत (वय 83, रा. तित्रब, ता. शेगाव, जि. बुलढाणा) यास रंगेहात पकडण्यात आले. आरोपीच्या अंगझडतीत 600 रुपये रोख रक्कम, वरळी मटका अंक लिहिलेल्या चिठ्ठ्या व एक डॉट पेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12(अ) अन्वये दाखल करण्यात आला असून आरोपीस न्यायालयात हजर राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पोहेका निलेश गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास पोहेका वाघमारे करत आहेत.









