---Advertisement---

शेगावात जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; वरली मटका प्रकरणात एकावर गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव I (युवा क्रांती वृत्तसेवा) : पोलिसांनी जुगार विरोधी कारवाई करत वरली मटका जुगार खेळणाऱ्या एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई एम.एस.ई.बी. चौक परिसरात करण्यात आली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोहेकॉं गजानन प्रल्हाद वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे अंतर्गत महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी दर्शन देविदास तायडे (वय 47, रा. खळवाडी, शेगाव) याच्यावर कारवाई करण्यात आली. दि. 14 मे 2026 रोजी सकाळी 11.45 ते 12.10 वाजताच्या दरम्यान एम.एस.ई.बी. चौकातील तहसील कार्यालयाच्या बोल कंपाऊंडजवळ पोलिसांनी खबऱ्याच्या माहितीवरून पंचासमक्ष जुगार रेड केली.

या कारवाईदरम्यान आरोपीकडून नगदी 620 रुपये, वरली मटका अंक लिहिलेल्या दोन चिठ्ठ्या तसेच एक डॉट पेन असा एकूण 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉं गणेश वाकेकर हे करत आहेत. कारवाई पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment