शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील इंदिरानगर परिसरातून २५ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अजय शहादेव पवार असे बेपत्ता तरुणाचे नाव असून या प्रकरणी शेगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय पवार हा २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता “जुने बस डेपो, शेगाव येथे मित्राच्या बहिणीच्या लग्नाला जात आहे” असे सांगून घरातून निघून गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला.
त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद लागत होता. तसेच नातेवाईक व मित्रांकडे शोध घेऊनही अजय पवार याचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. यानंतर त्याचा भाऊ विजय शहादेव पवार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अजय पवार याचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे – उंची ५.२ फूट, सावळा रंग, सडपातळ बांधा, काळे केस. अंगात पांढरा फुल बाह्यांचा शर्ट, काळी पॅन्ट आणि पायात काळे शूज होते. त्याची मानसिक स्थिती चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपास अधिकारी म्हणून रवी इंगळे कार्यरत आहेत.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अजय पवार याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ शेगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.








