शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : अकोला जिल्ह्यातील शरद नगर येथील प्रवीण जयवीर शर्मा (वय १७) हा युवक दिनांक २१ एप्रिल २०२६ पासून शेगाव येथील मंदिर परिसरातून बेपत्ता झाला आहे. संबंधित युवक थोडा मतिमंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रवीण हा शेवटचा शेगाव मंदिर परिसरात दिसून आला होता. त्यानंतर त्याचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. कुटुंबीयांनी तसेच पोलिसांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असला तरी अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
सदर युवक बाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा तो कुठे आढळल्यास त्वरित खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पीएसआय गजानन गावंडे
पोलीस स्टेशन, शेगाव शहर
मोबाईल: ९८२३२८१९९९
पोलिस प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, मिळालेली माहिती तत्काळ कळवावी, असेही सांगितले आहे.








