---Advertisement---

शेगावमध्ये ७५ वर्षीय वृद्ध बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा): तालुक्यातील पाळोदी येथील ७५ वर्षीय वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तोंडी रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार कैलास महादेव वानखडे (वय ४७, व्यवसाय शेती, रा. पाळोदी ता. शेगाव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील महादेव उकर्डा वानखडे (वय ७५) हे २८ मे रोजी सकाळी सुमारे ११ वाजता नातीला भेटण्यासाठी नागपूर येथे जात असल्याचे सांगून घरातून निघाले होते.

पाळोदी येथून ऑटो चालक गणेश तायडे यांच्या ऑटोमध्ये बसून ते शेगाव येथे आले. शिवाजी चौकातील मराठा पाणीपुरी सेंटरजवळ ते उतरल्याची माहिती ऑटो चालकाने दिली. मात्र त्यानंतर ते कुठे गेले याची माहिती मिळालेली नाही.

सायंकाळी उशिरापर्यंत घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शेगाव शहरासह विविध ठिकाणी शोध घेतला, मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बेपत्ता वृद्धाचे वर्णन :

  • नाव : महादेव उकर्डा वानखडे
  • वय : ७५ वर्षे
  • राहणार : पाळोदी ता. शेगाव
  • रंग : निमगोरा
  • उंची : ५.२ फूट
  • केस : पांढरे
  • अंगात : पांढऱ्या रंगाचा शर्ट व पांढरे धोतर
  • डोक्यावर : पांढरी टोपी
  • पायात : काळ्या रंगाचे शूज

सदर व्यक्तीबाबत कोणाला माहिती मिळाल्यास तात्काळ शेगाव शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment