---Advertisement---

शेगावात महिलेचा विनयभंग; धमकीप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव |(युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील पेठ मोहल्ला परिसरात एका 44 वर्षीय महिलेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून शेख अय्याज उर्फ बाबा अब्दुल रहीम (रा. पेठ मोहल्ला, शेगाव) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74 व 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 7 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता पेठ मोहल्ला येथे घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपीने फिर्यादी महिलेची छाती दाबून तिचा विनयभंग केला. तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक गजानन गावंडे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment