---Advertisement---

शेगाव नगर परिषदेत राजकीय घडामोडींना वेग; मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईसाठी सोमवारी विशेष सभा!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : १७ जुलै – शेगाव नगर परिषदेत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नगराध्यक्षांनी दि. २० जुलै ला सोमवारी विशेष सभा बोलावली आहे. या सभेत मुख्याधिकाऱ्यांवर विविध विषयांवर ठपका ठेवत कारवाईचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता असल्याने या बैठकीकडे शहरातील राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच काही विकासकामांना सुरुवात झाल्याचा मुद्दा या सभेत उपस्थित केला जाणार आहे. तसेच महात्मा फुले व्यापारी संकुलातील ३१ दुकानदारांबाबत नगर परिषदेने यापूर्वी मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी न झाल्याचाही मुद्दा चर्चेला येणार आहे.

याशिवाय, अधिवक्ता नियुक्तीबाबत झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात झालेला विलंब आणि इतर प्रशासकीय बाबींवरही मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या सर्व विषयांच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा प्रस्ताव सभेत मांडला जाऊ शकतो, अशी चर्चा नगर परिषद वर्तुळात सुरू आहे. विशेष सभेत कोणते निर्णय घेतले जातात आणि त्याचे पुढील राजकीय व प्रशासकीय परिणाम काय होतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment