---Advertisement---

शेगावात पैशांच्या वादातून तरुणाचा खून; लाकडी दांड्याने मारहाण केल्याचा आरोप!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात पैशांच्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आठवडी बाजार परिसरातील बजरंग बली मंदिराजवळ ही घटना घडली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गजानन राजू तायडे (वय 40, रा. धनगर नगर, शेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायमी अप. क्रमांक 305/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आरोपी शेख जावेद शेख करीम (वय अंदाजे 30, रा. काँग्रेस नगर, शेगाव) याने मयत शाहरुख हारून पटेल (वय 31, रा. शेगाव) याच्यासोबत दारू पिण्यासाठी पैशांच्या कारणावरून वाद घातला. वाद वाढल्यानंतर आरोपीने शाहरुख पटेल याच्या डोक्यावर लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शाहरुख पटेल याचा मृत्यू झाला. ही घटना 13 मे 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास आठवडी बाजारातील बजरंग बली मंदिराजवळ घडली.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील तसेच पोलीस निरीक्षक निमीष मेहेत्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निमीष मेहेत्रे हे स्वतः करत आहेत. दाखल अधिकारी म्हणून PSI कुणाल जाधव यांनी कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment