---Advertisement---

Shegaon News: शेगावात ८४ वर्षीय महिलेचा गळफास घेऊन मृत्यू; व्यंकटेश नगरातील घटना!!

---Advertisement---

शेगाव : शहरातील व्यंकटेश नगर परिसरात ८४ वर्षीय महिलेने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत गळफास घेतल्याची घटना शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या घटनेत कुमोद सखीहरी कुलकर्णी (वय ८४, रा. व्यंकटेश नगर, शेगाव) यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमोद कुलकर्णी या त्यांच्या कुटुंबीयांसह व्यंकटेश नगर येथे राहत होत्या. त्या नेहमी आजारी राहत असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी सकाळी त्यांच्या मुलाने शेजारी राहणारे मित्र गोपाल जमनादास राठी यांना फोन करून घरी बोलावले. राठी घरी गेल्यानंतर कुमोद कुलकर्णी या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत लोखंडी ग्रीलला चादरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

याबाबत गोपाल राठी यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तोंडी रिपोर्टवरून कलम १९४ BNSS अन्वये नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्रकृती वारंवार बिघडत असल्याने आजाराला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्राथमिक तपास सुरू केला. पोउपनि भामोदकर यांच्याकडे या प्रकरणाचा प्राथमिक तपास सोपविण्यात आला असून, ते पोलीस कर्मचारी पोका ११४६ यांच्यासह घटनास्थळी रवाना झाले.

घटना सकाळी सुमारे ६ वाजता घडल्याचे नमूद असून, याबाबतची नोंद सकाळी ७.३३ वाजता करण्यात आली. मृत्यूमागील नेमके कारण व इतर बाबींचा तपास शेगाव शहर पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment