---Advertisement---

शेगाव रेल्वे स्थानकावरील स्वच्छतागृहाचे कंत्राट रद्द!

---Advertisement---

शेगाव I (युवा क्रांती वृत्तसेवा) : येथे रेल्वे स्थानकावरील स्वच्छतागृहाच्या कंत्राटदाराकडून स्वच्छतेच्या नावाखाली प्रवाशांकडून अवैध शुल्क वसुली होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने संबंधित कंत्राट रद्द केले आहे. पत्रकार अमर बोरसे यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

२२ एप्रिल रोजी रेल्वे स्थानकावरील तिकीट घरासमोरील स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी प्रत्येकी ५ रुपये आणि शौचालय वापरासाठी १० रुपये आकारले जात असल्याचा प्रकार समोर आला होता. रेल्वेकडून लघुशंकेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसतानाही प्रवाशांकडून सर्रास वसुली केली जात असल्याने संताप व्यक्त होत होता.

या प्रकाराचा भांडाफोड पत्रकार अमर बोरसे यांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे केला. त्यांनी प्रत्यक्ष पुरावे गोळा करून विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. स्थानकावर येणाऱ्या भाविकांसह सामान्य प्रवाशांना या अवैध वसुलीचा मोठा फटका बसत होता. विशेषतः महिलांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले होते.

दरम्यान, ही बाब झेडआरयूसीसी सदस्य रविकांतदादा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेत तातडीने अवैध वसुली थांबवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही संबंधित कंत्राटदारावर कारवाई व्हावी यासाठी पत्रकार अमर बोरसे यांनी रीतसर तक्रार कायम ठेवली होती.

तक्रारीची दखल घेत विभागीय प्रबंधक बी. बी. तपस्वी यांनी चौकशी केली. चौकशीनंतर संबंधित कंत्राट २५ एप्रिलपासून रद्द करण्यात आले असून त्याबाबतचे पत्र उप स्टेशन प्रबंधक, शेगाव यांना पाठविण्यात आले आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment