---Advertisement---

शेगाव रेल्वे स्थानकावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटवण्याचे आवाहन!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि.५ जून-शेगाव येथील रेल्वे स्थानक परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी स्टेशन ड्युटी उपप्रबंधकांनी दिलेल्या माहितीनंतर शेगाव रेल्वे स्थानक परिसरात अंदाजे ४२ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सदर व्यक्तीची उंची सुमारे ५ फूट ६ इंच असून वर्ण सावळा व शरीरयष्टी मध्यम आहे. अंगात शर्ट व पॅन्ट असे कपडे परिधान केलेले होते.

मृतदेहाजवळ निळ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट तसेच खांद्याला अडकविण्याची पिशवी आढळून आली आहे. याप्रकरणी शेगाव रेल्वे पोलिसांनी कलम १९४ भारतीय न्याय संहिता अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सदर मृत व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास रेल्वे पोलीस ठाणे शेगाव येथे किंवा संपर्क क्रमांक ९०११२०४६९९ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ज्योती पंचकृष्ण खिराडे यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment