---Advertisement---

अकोट रोडवरील 42 वर्षीय रमेश जतकर यांची गळफास घेऊन आत्महत्या; शहर पोलिसांकडून तपास सुरू!!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील अकोट रोडवरील शर्मा प्लॉट परिसरात 42 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश दत्ताप्पा जतकर (वय 42) हे अकोट रोडवरील शर्मा प्लॉट परिसरात राहत होते. त्यांना दारूचे व्यसन असल्याने पत्नी व दोन मुली या धाराशिव येथे वेगळ्या राहत असल्याचे फिर्यादींनी तक्रारीत नमूद केले आहे.

11 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 6.45 वाजता फिर्यादी दिगंबर मलकाप्पा जतकर हे नेहमीप्रमाणे दुकान उघडल्यानंतर पुतण्याला आवाज देण्यासाठी गेले असता, रमेश यांनी घरातील सिलिंग फॅनला पांढऱ्या रंगाच्या दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ परिसरातील नागरिकांना व पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रमेश यांना सरकारी रुग्णालय, शेगाव येथे नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

फिर्यादींच्या तक्रारीनुसार, दारूचे व्यसन व आजारपणामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शेगाव शहर पोलिसांनी कलम 194 BNSS अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोहेकॉ. सुरेंद्रसिंग चव्हाण करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment