---Advertisement---

शेगावातील स्वस्त धान्य दुकानदारांची थकीत कमिशनसाठी प्रशासनाकडे धाव!!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव तालुक्यातील प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत थकीत कमिशनची रक्कम तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे.

संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र शासनाने एप्रिल ते जून 2026 या तीन महिन्यांचे धान्य वाटप एकत्रित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मे महिन्यात एप्रिल 2026 चे धान्य दुकानदारांकडे पोहोचले असले तरी मे आणि जून महिन्याचे धान्य अद्याप प्राप्त झालेले नाही.

यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना नागरिकांना नियमित धान्य वाटप करताना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच शासनाकडून मागील तीन महिन्यांचे कमिशनही अद्याप मिळाले नसल्याने दुकानदार आर्थिक संकटात सापडले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दुकानदारांनी प्रशासनाकडे एप्रिल 2026 पासूनचे प्रलंबित कमिशन तातडीने वितरित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच धान्य वितरणातील अडचणी दूर करून दुकानदारांना वेळेत मानधन मिळावे, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या निवेदनावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन पाठविण्यात आले आहे.

या वेळी शेगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर पहुरकर, सचिव सोनू मोहोड, उपाध्यक्ष दीपक दादा धमाळ यांच्यासह तालुक्यातील समस्त स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment