शेगाव | (आकाश बोरसे) : शेगाव एसटी आगारात ड्युटीवर हजर होण्यासाठी आलेल्या एसटी चालकाला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन गणेशराव सनगाळे (वय 40, व्यवसाय – एसटी चालक, शेगाव डेपो) यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रमोद गणपत पोहरे (रा. शेगाव एसटी डेपो परिसर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, 13 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजता शेगाव आगारात फिर्यादी ड्युटीसाठी आले असता, जुन्या वादाच्या कारणावरून आरोपीने त्यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच “तुला पाहतोच” असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 296 व 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम आघाव करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)








