---Advertisement---

शेगावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला; पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न!!

---Advertisement---

शेगाव(युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील रेल्वे स्टेशन ते गजानन महाराज मंदिर मार्गावरील भारत पेट्रोलपंपासमोर फुटपाथखाली एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकस्मात मृत्यु कलम 194 BNS अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले आहे. ही घटना दि. 17 मे 2026 रोजी रात्री 10 वाजण्यापूर्वी घडल्याचा अंदाज असून, दि. 18 मे 2026 रोजी पहाटे 2:42 वाजता नोंद करण्यात आली.

मृत व्यक्ती अंदाजे 40 वर्षीय पुरुष असून त्याचा रंग सावळा, उंची अंदाजे 5.5 फूट आहे. मृताच्या अंगात ग्रे रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची नाइट पॅन्ट होती. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

फिर्यादी म्हणून पोहेका सुरेंद्रसिंग चव्हाण यांनी माहिती दिली. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती रस्त्यालगत पडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याला ॲम्ब्युलन्सद्वारे साईबाई मोटे सामान्य रुग्णालय, शेगाव येथे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका सुरेंद्रसिंग चव्हाण करीत आहेत. जर कुणास मृत व्यक्ती ओळखीचा असल्यास शेगाव शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment