---Advertisement---

शेगावातील अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू; शहर पोलिसांत मर्ग दाखल!

---Advertisement---

शेगाव |(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 15 जून 2026शेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 50 वर्षीय अनोळखी इसमाला काही समाजसेवकांनी बेशुद्ध अवस्थेत 14 जून रोजी सकाळी 9 वाजता सामान्य रुग्णालय, शेगाव येथे उपचारासाठी दाखल केले होते. संबंधित व्यक्तीची प्रकृती अत्यंत गंभीर होती. उपचार सुरू असतानाच रात्री 10.55 वाजता त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती प्रकाश मोरे यांनी डॉक्टरांच्या लेखी मेमोच्या आधारे पोलिसांना दिली. त्यावरून शेगाव शहर पोलिसांनी कायम मर्ग क्रमांक 34/2026 कलम 194 BNSS अंतर्गत नोंद केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास गजानन गांवडे करीत असून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment