शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहर पोलिसांनी वरली मटका जुगार प्रकरणात कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीकृष्ण नारायण गवई (वय 20 वर्षे, रा. खळवाडी, शेगाव) यास जुने तहसील कार्यालयाच्या भिंतीजवळ दि. 18 मे 2026 रोजी सायंकाळी 7:10 वाजताच्या सुमारास पकडण्यात आले.
पोहेका गणेश वाकेकर यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकला असता आरोपी हा लोकांकडून पैसे घेऊन चिठ्ठ्या देत “वरली मटका” नावाचा जुगार खेळवत असल्याचे निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान आरोपीकडून 850 रुपये रोख रक्कम, एक डॉटपेन आणि वरली मटका आकडे लिहिलेली चिठ्ठी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका गजानन वाघमारे करीत आहेत.








