---Advertisement---

मुरारका चौकात वरली मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; एक आरोपी ताब्यात!!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) शेगाव शहर पोलीसांनी मुरारका चौक परिसरात वरली मटका जुगारावर धडक कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई दि. 19 मे 2026 रोजी दुपारी करण्यात आली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोहेका गजानन वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी गजानन राजू तायडे (वय 41 वर्षे, रा. धनगर नगर, शेगाव) याच्यावर मुरारका चौक येथे खबऱ्याच्या माहितीवरून पंचासमक्ष जुगार रेड करण्यात आली. आरोपी हा लोकांकडून पैसे घेऊन त्यांना चिठ्ठ्या देत “वरली मटका” नावाचा जुगार पैशाच्या हारजीतवर खेळविताना आढळून आला.

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून नगदी 720 रुपये, एक डॉटपेन, वरली मटका आकडे लिहिलेली चिठ्ठी असा एकूण 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणाची नोंद दि. 19 मे 2026 रोजी सायंकाळी 7:36 वाजता करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका गणेश वाकेकर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment