शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : पोलिसांनी जुगार विरोधी मोहिमेत आणखी एक कारवाई करत वरली मटका जुगार प्रकरणात 83 वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जुन्या रेल्वे गेटजवळ उड्डाणपुलाखाली करण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोहेकॉं गजानन प्रल्हाद वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे अंतर्गत महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी शालीग्राम रामचंद्र राउत (वय 83, रा. तिंत्रव ता. शेगाव जि. बुलढाणा) याच्यावर कारवाई करण्यात आली. दि. 14 मे 2026 रोजी सायंकाळी 6.35 ते 7.05 वाजेदरम्यान जुन्या रेल्वे गेटजवळील उड्डाणपुलाखाली पोलिसांनी खबऱ्याच्या माहितीवरून पंचासमक्ष जुगार रेड केली.
या कारवाईत आरोपीकडून नगदी 850 रुपये, वरली मटका अंक लिहिलेली चिठ्ठी तसेच एक डॉट पेन असा एकूण 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉं संतोष गावई हे करत आहेत. संबंधित कारवाई पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.








